
निसर्गचक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणवासीयांना राज्य सरकारने विशेष बाब म्हणून आखणीन वाढीव दराने मदत जाहीर केली आहे. त्यानुसार कपडे भाड्यांसाठी दहा हजार तर वादळात नुकसान झालेल्या घरांसाठी 15 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांची वाढीव मदत जाहीर केली आहे. तर मच्छिमारांना बोटीपासून जाळींचे नुकसान भरून काढण्यासाठी पाच हजारांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढीव मदत मिळणार आहे.
राज्याच्या किनारपट्टीवरील व इतर भागातील तेरा जिल्हे व 75 तालुक्यांना 3 जून रोजी निसर्गचक्रीवादळाचा मोठा फटका बसला. या वादळग्रस्तांना एनडीआरएफ व एसडीआरएफचे प्रचलित दर बाजूला ठेवून वाढीव मदत जाहीर केली होती. नुकसान भरपाईच्या निकषात बदलांमुळे वादळग्रस्तांना भरीव मदत मिळाली होती त्यानंतर 17 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विशेष बाब म्हणून निकष व अटींमध्ये बदल करून राज्य सरकारच्या निधीतून मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही वाढीव मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.
कपडे व भांडय़ांसाठी दहा हजार
नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णपणे उध्वस्त झाल्यास कपडे व घरगुती भांडय़ांसाठी पूर्वी प्रती पुटुंब कपडय़ांच्या नुकसानीसाठी अडीच हजार व घरगुती भांडी व वस्तुंसाठी अडीच हजार असे अशा पाच हजार रुपयांची मदत केली जात होती. पण आता निसर्ग चक्रीवादळात अंशतŠ पडझड होऊन घरांचे छत-काwले उडून गेली असल्यास कपडे, भांडी व वस्तुंसाठी प्रती पुटुंब दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
नुकसानग्रस्त घरांसाठी आता 15 ते 50 हजार
नैसर्गिक आपत्तीrमध्ये घराचे किमान 25 टक्के नुकसान झाले असल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या(एसडीएफआर) प्रचलित दरानुसार पक्क्या व कच्च्या घरासाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जात होती. वादळानंतर सरकारने ही मदत वाढवून 15 हजार रुपये केली होती. पण आता विशेष बाब म्हणून हीच रक्कम आता प्रती घर 25 हजार रुपये करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तर 50 टक्के नुकसान झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी आत 50 हजार रुपयांची आखणीन वाढीव मदत जाहीर केली आहे.
मच्छिमारांना विशेष पॅकेज
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या मच्छिमारांसाठी विशेष मदतीचे पॅकेज दिले आहे. एसडीआरएफच्या प्रचलित दरानुसार बोटी, जाळींच्या दुरुस्तीसाठी 2 हजार 600 ते 4 हजार 100 रुपयांची मदत दिली जात होती. आता विशेष बाब म्हणून बोटीची अंशतŠ दुरुस्तीसाठी 10 हजार रुपये बोट पूर्ण नष्ट झाली असल्यास 25 हजार रुपये, मासेमारीच्या जाळीचे अंशतŠ किंवा पूर्ण नष्ट झाल्या असल्यास पाच हजार रुपयांची मदत केली जाईल. याबाबतचा शासन निणऱय राज्याच्या महसूल व वन विभागाने जारी केला आहे.


























































