
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले नितेश राणे आणि राकेश परब यांच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद झाला, पण सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता सोमवारी त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.
आज झालेल्या सुनावणी दरम्यान आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आणि सतीश माने-शिंदे यांनी जोरदार युक्तिवाद करत राणे यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या वेळी सरकारी वकिलांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज करत नितेश राणे यांची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्यासमोर नको, अशी मागणी केली. उलट शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी सुनावणी ज्या न्यायाधीशांसमोर सुरू आहे त्यांच्यासमोरच ही सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद केला. त्यामुळे आता सोमवारी नितेश राणे यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

























































