शिर्डीमध्ये प्रचारसभेत नितीन गडकरींना आली भोवळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शिर्डी

शिर्डी येथे प्रचारासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ आली. शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी त्यांनी ही सभा घेतली होती. गडकरी यांना ब्लड शुगरचा त्रास आहे.यापूर्वीही 7 डिसेंबरला राहुरीत त्यांना भर सभेत भोवळ आली होती.

त्या डॉक्टरांनी त्यांचे चेक अप केले व त्यांना नागपूरला जाण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर गडकरी विमानाने नागपूरला रवाना झाल्याचे समजते.