आमच्या जातीला आरक्षण असते तर सरकारी बाबू झालो असतो- नितीन गडकरी

1679

मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं, मला नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा व्हायचं आहे. पर्यायाने हेदेखील फार बरे झाले की आमच्या जातीला आरक्षणच नाही, अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो, असं केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

गडकरी म्हणाले, प्रत्येक समाजाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. अनेक समाजात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पण त्यांचा विकास झाला नाही. तो करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्न केल्यास कुठलंच कार्य अशक्य नाही. त्यासाठी समाजातील जागरुकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच मी जाती धर्मभेद पाळत नाही. सगळ्याच समाजाच्या कार्यक्रमात जातो, प्रत्येक समाजाची मागणी असते आम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे, मंत्रिपद समाजाला मिळालं पाहिजे. पण मी थोडा स्पष्ट बोलतो आणि सांगतो की, विशिष्ट समाजातला माणूस मंत्री झाला की त्याच्या हातून त्याच समाजाचा विकास होईल असं नाही. त्याला सगळ्याच समाजाचा विचार करावा, असे गडकरींनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे ते म्हणाले, आतापर्यंत मी 15 हजार ग्रामीण भागातील युवकांना रोजगार दिला, त्यात माझ्या समाजाचे 50 सुद्धा नाहीत. मी जाती- धर्म मानत नाही, तर प्रत्येकासाठी काम करतो, असंही नितीन गडकरींनी सांगितलं. ते नागपुरात अखिल माळी समाज महाधिवेशनाच्या (Mali community) कार्यक्रमात बोलत होते.

आपली प्रतिक्रिया द्या