
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकारी बँकांच्या भूमिकेचे कौतुक करताना गरीब आणि सामान्य नागरिकांना कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केले. मोठे लोक कर्जबुडवे ठरत असताना गरीब माणूस नियमितपणे पैसे भरतो, असे त्यांनी म्हटले.
एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “गरीब माणूस नियमितपणे पैसे भरतो, पण श्रीमंत लोक कर्ज बुडवून डिफॉल्टमध्ये जातात. दुर्दैवाने हे रेकॉर्डमध्येही हे सिद्ध होते.”
ते पुढे म्हणाले की, “पैसा आधी धनवान लोकांनाच सहज मिळतो, पण गरीब माणसाला कर्ज देताना खूप अडथळे निर्माण होतात.” सहकारी बँकांनी समाजातील छोट्या आणि सामान्य लोकांचे जीवन बदलण्यात मोठी भूमिका बजावल्याचेही गडकरी यांनी नमूद केले. “अशा छोट्या लोकांचे आयुष्य बदलण्याचे काम सहकारी बँकांनी केले आहे,” असे ते म्हणाले.

























































