मल्ल्याबद्दलच्या माझ्या विधानाचा मीडियाने विपर्यास केला – गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

विजय मल्ल्याबद्दल मी केलेल्या विधानाचा मीडियाने विपर्यास केला, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. एकदा चूक केली म्हणून विजय मल्ल्याजी यांना चोर म्हणणे योग्य नाही, असे विधान गडकरी यांनी मुंबई येथे केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे.

गडकरी हे आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. विजय माल्ल्या यांनी काही चुकीचे केले असेल आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीवर कारवाई होत असेल तर ते योग्यच आहे, असे आपण म्हटले होते, अशी माहिती गडकरी यांनी दिली. मल्ल्या यांचे बँक अकाऊंट हे 40 वर्षे प्राइम अकाऊंट होते. पण 41व्या वर्षी ते बिघडले. व्यवसायात असे चढ-उतार सुरूच असतात, असेही आपण बोललो होतो आणि त्याबद्दल खुलासाही केला होता. परंतु मीडियातील काही लोकांनी त्याचा विपर्यास केला, असे गडकरी यांनी सांगितले.