
नागरिकत्व कायदा व एनआरसीवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेले आहे. आतापर्यंत या आंदोलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या कायद्याला व एनआरसीला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, आसाम, ओडीशा, दिल्ली या राज्यांचा विरोध असून यात आता आणखी एका राज्याची भर पडली आहे.
Bihar Chief Minister Nitish Kumar: National Register of Citizens (NRC) will not be implemented in Bihar. (file pic) pic.twitter.com/0Yri4Q8rze
— ANI (@ANI) December 20, 2019
संसदेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या बाजूने मतदान करणाऱ्या जदयूने बिहारमध्ये मात्र एनआरसी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री व जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी हे स्पष्ट केले आहे, याआधी जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी देखील बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नसल्याचे सांगितले होते. जदयूमध्ये एनआरसीवरून मतभेद झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी राजीनामा सादर केला होता. मात्र नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावत बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नसल्याचे त्यांना सांगितले होते.



























































