जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी नितीश कुमार पंतप्रधानांना भेटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारसह देशभरात जातीनिहाय जनगणना व्हाव्ही या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू नेते नितीशकुमार सोमवारी 23 ऑगस्टला पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. नितीश यांच्यासोबत बिहारमधी सर्वच पक्ष आपापसातील मतभेद विसरून या भेटीत सामील होणार आहेत. विशेष म्हणजे विरोधी पक्ष आणि राजद नेते तेजस्वी यादव हेही या मागणीला दुजोरा देण्यासाठी भेटीत पंतप्रधानांना साकडे घालणार आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पुन्हा पत्रकारांशी बोलताना बिहारसह देशभरात जातीनिहाय जनगणनेच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. ही मागणी करण्यासाठी आपण विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहोत असे नितीश म्हणाले. याबाबत सहमतीसाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांच्या उत्तरादाखल पुढे सांगितले