निवधे बावनदी पूलावरुन ग्रामस्थांना करावा लागतोय जीव मुठीत धरुन प्रवास

468

संगमेश्वर तालुक्यातील निवधे गाव बावनदी पुलाची अवस्था अतिशय धोकादायक झाली आहे. 700 ते 750 लोकसंख्या असणाऱ्या निवधे गावातुन बामणोली, ओझरे, मारळ, मार्लेश्वर, अंगावली, देवरुख या ठिकाणी जाण्यासाठी मोठया प्रमाणात या पुलावरून रहदारी चालू असते गावातील लोक व मार्लेश्वर करिता चालत येणार भाविक हे या पुलाचा वापर करत असतात.

पूल पंचवीस ते तीस वर्ष जुना असून तो अतिशय धोकादायक बनला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पूल व्हावा अशी ग्रामस्थ अनेक वर्ष मागणी करत आहेत. लोकप्रतिनिधींनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे नाहीतर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळ्यात बावनदीला मोठे पाणी आल्यानंतर पाणी या लोखंडी पूलाला स्पर्श करते. अशावेळी पूलावर अलीकडील पलीकडे जातांना जीव अक्षरशः मुठीत धरुन जावे लागत असल्याने शासनाने ग्रामस्थांच्या या जीवघेण्या प्रवासातून मुक्तता करावी अशी मागणी करण्यात आली आहे. बावनदीवरील हा पूल म्हणजे लोखंडी साकव असून याचे काही भाग गंजून सडले आहेत. त्यामुळे मोठ्या पुरात हा साकव वाहून जाण्याची देखील भिती व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या