
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचलाय. मात्र परीक्षा काळामध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या लढतींच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. या स्पर्धेतील रात्रीच्या लढती 8 वाजताच सुरू होणार आहेत. या स्पर्धेचे प्रसारक ‘स्टार स्पोर्टस्’ वाहिनीकडून रात्रीच्या लढती 7 वाजता सुरू करण्यात याव्यात अशी मागणी केली होती, पण बीसीसीआयने ही मागणी फेटाळली अशा प्रकारचे वृत्त इंग्रजी दैनिकामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संध्याकाळी 7 वाजता लढती सुरू झाल्यास अकरापर्यंत त्या संपू शकतात. अशा वेळी या लढतींना टीव्हीवरून चांगला प्रेक्षकवर्ग लाभू शकतो. तसेच सामना संपल्यानंतर क्रिकेटप्रेमींना सुरक्षित घरीही पोहोचता येते.





























































