
परदेशात रुग्ण वाढत असले तरी मुंबई व पुणे कगळता अन्य जिह्यांमध्ये कोरोनाचे खूपच कमी रुग्ण आहेत. 15 दिवसांत सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. दोघेही बरे झाले असून, मागील दहा दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने सध्या सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त आहे.
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये आरोग्य विभागाची झोप उडविणाऱया पंढरपूर, बार्शी, मोहोळ, करमाळा, माळशिरस या तालुक्यांसह सोलापूर शहरातील कोरोना आता शांत झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये मृत्युदरात देशातील पहिल्या टॉप-टेन शहरांत सोलापूर होते. त्यावेळी केंद्रीय पथकाने सोलापुरात येऊन शहरातील परिस्थितीची पाहणी केली. तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कोरोना रुग्ण आढळणाऱया परिसरात कडक निर्बंध घातले आणि कोरोना आटोक्यात यायला मदत झाली. त्यानंतर प्रतिबंधित लसीकरण सुरू झाले आणि जिह्यातील 34 लाखांवर व्यक्तींनी प्रतिबंधित लस टोचून घेतली.
कोविशिल्ड, कोवंक्सिन, कोर्बेवंक्स लस उपलब्ध झाली आणि कोरोना आटोक्यात आला. त्यानंतर मृत्युदरदेखील कमी झाला. कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही तीव्र, मध्यम लक्षणे आढळली नाहीत; परंतु, आता जपान, जर्मनी, अमेरिका, चीन क ब्राझीलमध्ये बीएफ-7 व्हेरियंटचे रुग्ण काढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. मात्र, आपल्याकडे तशी घाबरण्यासारखी काहीच परिस्थिती नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
परदेशात कोरोना काढतोय म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यभरात टेस्टिंग, ट्रकिंग, ट्रिटमेंट, लसीकरण क कोरोनापूर्वी खबरदारी या पंचसूत्रीवर भर दिला जात आहे. कोरोना काढू नये म्हणून टेस्टिंगवर भर दिला जात आहे. शहरातील सुमारे तीनशे, तर ग्रामीणमधील सहाशे संशयितांची दररोज टेस्टिंग होत आहे.
सर्दी, ताप, खोकला असलेल्यांना आणि रुग्णालयाकडून पाठविलेल्या संशयितांचीच आता टेस्टिंग केली जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील दहा दिवसांत शहर-ग्रामीणमध्ये एकही पॉझिटिक्ह रुग्ण आढळलेला नाही. तरीपण, आता दोन डोस घेतलेल्यांना संरक्षित (बूस्टर) डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. जिह्यासाठी 15 हजार डोस शिल्लक आहेत.


























































