कोपरगावला दिलासा, 55 दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

नगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये  सारी आजार, ने तीन महिलांचा मृत्यू झाला असला तरी आता कोपरगावकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. राहाता संगमने,  वैजापूर,  सिन्नर,  येवला व लासलगाव असा चोहोबाजूंनी रेड झोन मध्ये घेरलेलो असताना गेल्या 55 दिवसात कोपरगाव  नगरपालिका आणि कोपरगाव ग्रामीण क्षेत्रात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.  

10 एप्रिल नंतर कोपरगाव तालुक्यात एकही पाॅझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. कोपरगावमध्ये  79 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 73 जणांना सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे पाठवले होते. तर ममदापुरच्या  त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांपैकी सहा जणांचे स्वॅब  कोपरगाव येथे घेतले होते. त्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने  डॉ.संतोष  विधाटे यांनी स्पष्ट केले आहे.

कोपरगाव साठी ही आनंदाची बाब आहे.  आज अखेर कोपरगाव तालुक्यात एकून 10656 व्यक्ती आल्या आहेत.  यामध्ये जिल्हयाबाहेरील 9378 राज्य बाहेरुन 300 देशाबाहेरुन 80 व्यक्ती आले आहेत.  1 मे नंतर आलेल्या व्यक्तिंना आता संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. यानुसार आज अखेर तालुक्यात 1647 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.  1060 जणांनी संस्थात्मक क्वारंटाईन पुर्ण केले आहे.  जनतेने आपल्या जवळपास कोणी बाहेरगावहुन व्यक्ती आल्यास आरोग्य विभागास माहिती द्यावी. तोंडाला रुमाल बांधावा. सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

आपली प्रतिक्रिया द्या