
केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशातील युवकांना यापुढील रोजगार मिळण कठीण होऊन बसेल. देशात गेल्या 70 वर्षात झाली नाही अशी परिस्थितीती येत्या सहा-सात महिन्यात रोजगाराच्या बाबतीत होईल, अशी भिती कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. उद्योगधंदे बंद पडत असताना केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. याबाबत राहुल गांधी यांनी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. हिंदुस्थानातील 90 टक्के रोजगार हा असंघटीत अर्थव्यवस्थेतून मिळत असतो. पण हे क्षेत्रच मोदी सरकारने मोडीत काढले असून परिणामी लोकांना रोजगार मिळणे अवघड झाल्याची टीका त्यांनी केली.
देशातील उद्योग-व्यवसायांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकामागोमाग एक कंपन्यात बंद होत आहेत. लघु आणि मध्यम उद्योगही कर्जाच्या हफ्ते फेडण्यात मिळालेली सूट संपल्यानंतर नष्ट होतील, अशी इबती राहुल गांधी यांनी व्यक्त केली. करोनामुळे मोठं नुकसान होईल असं मी सांगितलं असता मीडियाने माझी खिल्ली उडवली. जर तुम्हाला विश्वास नसेल तर माझं ऐकू नका. पुढील सहा ते सात महिने वाट पाहा, असे त्यांनी सांगितले.

























































