९ एप्रिल ते २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत ‘एक्झिट पोल’वर बंदी: निवडणूक आयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत ‘एक्झिट पोल’ आयोजित करण्यास किंवा त्यांचे निकाल प्रसारित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.

आयोगाने असा इशाराही दिला आहे की, या कालावधीत एक्झिट पोल घेणे किंवा त्यांचे प्रक्षेपण करणे हे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२६(अ) चे उल्लंघन ठरेल आणि यासाठी ‘दोन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही’ अशी शिक्षा होऊ शकते.

केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये ९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना, तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे त्याआधी ‘एक्झिट पोल’ घेण्यास किंवा जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे.