नो पार्किंगमधील गाडीवर कारवाई केल्यामुळे कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीवर कारवाई केल्याच्या रागातून महिला अमंलदारासह टेम्पोचालकाला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांविरूद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावर घडली.

फिर्यादी महिला कर्मचारी काल संध्याकाळी नो पार्किंगमधील वाहनांविरूद्ध कारवाई करीत होत्या. त्यावेळी नो पार्किंगमधील दुचाकीवर कारवाई केल्याचा राग आल्यामुळे दोघाजणांनी फिर्यादी महिलेसोबत वादावादी केली.

त्यांना अपशब्द बोलून धक्काबुक्की केली. त्याशिवाय टेम्पोचालक सलीम शेख यांच्या शर्टशी कॉलर पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर तपास करीत आहेत.