
सामना प्रतिनिधी । गोंदिया
महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया दोन लोकसभा मतदार संघासह देशात ४ ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येते आहे. गोंदियात सुरू असलेल्या मतदानावेळी इव्हीएमच्या गोंधळामुळे ३५ मतदान केंद्रांवर मतदान बंद करण्यात आल्याची माहिती खासगी वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केली. मात्र निवडणूक अधिकारी अभिमन्यु काळे यांनी हे वृत्त खोटं असल्याचं सांगत सर्व केंद्रांवर मतदान सुरळीत सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तसेच मतदानासाठी रांगेत उभा राहिलेला शेवटचा मतदार आपला हक्क बजावत नाही तोपर्यंत हे मतदान सुरळीत सुरू राहील असंही काळे यांनी स्पष्ट केल्यांचं वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या आधी दुपारपर्यंत भंडारा, गोंदियात तब्बल ४५० मशीन बंद असल्याची तक्रार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच इव्हीएमसोबत जाणीवपूर्वक छेडछाड झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता.

































































