
सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह रजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुशांतचे काही मित्र रात्री त्याच्या घरीच थांबले होते. जेव्हा सुशांतच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुशांतच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अजून कळालेले नाही. घटनास्थळी कुठल्याही प्रकाची सुसाईट नोट मिळालेली नाहिये.
सुशांत सिंह च्या नोकराने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. जेव्हा सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याच्या घरी काही मित्र उपशित होते. जेव्हा त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा सुशांतने आत्महत्या केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात होता असे पोलिसांनी सांगितले. त्याची अभिनयाची कारकीर्दही सुरळीत होती. सुशांत नेमक्या कुठल्या कारणामुळे नैराश्यात होता हे स्पष्ट झालेले नाही.























































