मतदार सोडा, या ग्रामपंचायतीत उमेदवारांनीही केले नाही मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील तब्बल बारा हजार ग्रामपंचायतींमध्ये आज निवडणुकीचा धुरळा  उडाला. राज्यभरात 79 टक्के मतदान झाले. गावात सत्ता कुणाची याचा निकाल आता सोमवारी लागेल. मात्र दिवसभरात कुठल्या गावात काय घडले याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

कोल्हापूर शाहूवाडी पेरीड गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शून्य टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर अधिकारी-कर्मचारी होते. पण दिवसभरात एकही मतदार किंवा उमेदवारही मतदानासाठी तिथे फिरकला नाही.

ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गेली 68 वर्षे पेरीडमध्ये बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. यावेळी एकूण 9 जागांपैकी 8 जागा बिनविरोध आल्या तर एका जागेसाठी निवडणूक लागली. मात्र गावाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा अबाधित रहावी म्हणून मतदार आणि उमेदवार असे कुणीही मतदान केंद्राकडे फिरकलेही नाहीत.