
ब्रेक दी चैन अंतर्गत दिनांक 6 जून 2021 रोजी जिल्हा प्रशासनाने अनलॉकचे जे आदेश दिलेले आहेत तेच आदेश शनिवार-रविवार या दिवशी ही लागू राहणार आहेत. शनिवार रविवार सर्व दुकाने नियमितपणे सुरु राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारही त्या त्या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली आहे.
प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत वीकेंड लॉकडाऊन नसेल तसेच कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे तंतोतंत पालन करून कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.




























































