संघाच्या व्यासपीठावर नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हजेरी लावली होती. आता दसर्‍यानिमित्त होणार्‍या संघाच्या कार्यक्रमात नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वार्षिक कार्यक्रमासाठी सत्यार्थी यांना आमत्रण दिले होते. हे आमंत्रण सत्यार्थी यांनी स्विकारले असून संघाचे वरिष्ठ नेते मनमोहन वैद्य यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 18 ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त संघाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण याच दिवशी सरसंघचालक राष्ट्रीय विषयांवर संघटनेला संबोधित करतात.

विजयादशमीनिमित्त संघाकडून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात देशातील मोठ्या व्यक्तींना आमंत्रण दिले जाते. जूनमध्ये देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी संघाच्या तृतीय वर्षाच्या समोरोपच्या कार्यक्रमात सामील झाले होते. या कार्यक्रमात सामील होऊ नका असा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुखर्जी यांना दिला होता. पण हा सल्ला धुडकावून मुखर्जी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.