तिने डोळ्याला पट्टी बांधली मग त्याचा गळा चिरला

82

सामना ऑनलाईन । नोएडा

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे शरीरसंबंधाच्या आधी एका प्रेयसीने प्रियकराच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायरा असे तिचे नाव असून इसराफिल असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

चार वर्षापूर्वी इसराफिल रहीम नावाच्या मित्राबरोबर ट्रेनमधून प्रवास करत होता. त्यावेळी प्रवासादरम्यान त्यांची सायरा नावाच्या तरुणीबरोबर ओळख झाली. त्यानंतर इसराफिल आणि सायरा वरचेवर भेटू लागले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पण २ वर्षापूर्वी इसराफिलने दुसऱ्या तरुणीबरोबर निकाह केला. यामुळे सायरा निराश झाली. त्यानंतर इसराफिलचा मित्र रहीमबरोबर तिची जवळीक वाढली. याबद्दल इसराफिलला कळताच तो चिडला. तो रोज सायराला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. यामुळे वैतागलेल्या सायरा व रहीमने इसराफिलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सायराने इसराफिलला भेटण्यास बोलावले. दोघेजण सेक्टर 167 मध्ये गेले. तिथे त्यांनी एक रुम घेतला. त्यानंतर सायराने आपल्या गोड बोलण्यात इसराफिलला अडकवले.

इसराफिलने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यास सायरानेही होकार दिला. पण त्याआधी तिने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता तिने धारदार शस्त्राने त्याचा गळाच चिरला. त्याचवेळी त्या रुममध्ये लपलेला रहीम बाहेर आला त्यानेही इसराफिलच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. त्यानंतर रहीम विमानाने बिहारला निघून गेला. पण खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या