विद्यार्थ्यांनी भरलेल्या व्हॅनचा अपघात, गाडी चालवताना चालकाला झाले ब्रेन हॅमरेज

दिल्ली नोएडा येथे एका खासगी शाळेच्या व्हॅन चालकाला गाडी चालवताना ब्रेन हॅमरेज झाले आणि व्हॅन डिव्हायडरवर धडकली. सुदैवाने अपघातात विद्यार्थ्यांना काहीच दुखापत झाली नाही तर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नोएडा सेक्टर 16 ए येथे असलेल्या एपीजे शाळेची व्हॅन काल चार ते पाच विद्यार्थी घेऊन परतत होती. अचानक गाडी चालवताना व्हॅन चालकाची तब्येत बिघडली आणि त्याचा गाडीवरचे नियंत्रण सुटून व्हॅन सेक्टर 71जवळील साई मंदिरासमोरील डिव्हायडरवर धडकली. सुदैवाने या अपघातात विद्यार्थ्यांनी दुखापत झाली नाही. अपघातानंतर नागरिक व्हॅनजवळ पोहोचल्यावर त्यांनी चालकाला बेशुद्धावस्थेत पाहिले. त्यानंतर व्हॅन चालकाला कैलास रुग्णालयात भरती केले जिथे डॉक्टरांच्या टीमने ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती दिली.

घटनेबाबत नोएडा सेक्टर 71 मध्ये राहणारी संजीवने सांगितले की, त्यांची मुलगी एपीजे शाळेत शिकते. जेव्हा त्यांच्या शाळेची व्हॅन येण्याची वेळ झाली आणि व्हॅन बराच वेळ न आल्याने अखेर त्यांनी चालक देवेंद्र याला फोन केला. त्यावेळी त्याचा फोन कोणीतर वेगळ्याच माणसाने उचलला आणि अपघाताची माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून देवेंद्रला नोएडाच्या कैलास रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासले असता त्या चालकाला ब्रेन हॅमरेज झाल्याचे समोर आले. चालकाचे नातेवाईक आल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याच आली. आता त्याची हालत ठिक आहे.