
कराड दक्षिण मतदार संघात शुक्रवारी 9 जणांनी 13 तर उत्तरेमध्ये 8 जणांनी 12 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दक्षिणमध्ये 20 उमेदवारांचे 29 तर उत्तरेत 12 उमेदवारांचे 17 अर्ज दाखल झाले आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतर्फे आमदार शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, शिवसेनेतर्फे धैर्यशील कदम, वंचित बहुजन आघाडीतर्फे सुभाष बाबुराव पिसाळ, बसपतर्फे जगन्नाथ लक्ष्मण वाघमारे व बाळासाहेब तुकाराम थोरात, अपक्षामध्ये मनोज घोरपडे, सचिनकुमार नलवडे, साजिद गुलाब मुल्ला, संतोष गणपत कमाने, विनोद बबन बागल, भानुदास ज्ञानू पोळ, जगन्नाथ गणपती सोनावले यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
कराड दक्षिणमध्ये काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपतर्फे अतुल भोसले, बळीराजा संघटनेतर्फे पंजाबराव पाटील, बसपतर्फे आनंदा रमेश थोरवडे, एमआयएमतर्फे अल्ताफ शिकलगार, वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळकृष्ण शंकर देसाई यांचा तर अपक्षामध्ये अॅड. उदयसिंह विलासराव पाटील, अमोल साठे, नितीन महावीर लोंढे, गोरख गणपती शिंदे, वैष्णवी राजेंद्रकुमार भोसले, सदाशिव सीताराम रसाळ, सतिशकुमार वसंत यादव, लतिका सुलेमान मुजावर, सुरेश जयवंतराव भोसले, विश्वजीत अशोक पाटील, सचिन तातोबा गोतपागर, संतोष अशोक थोरवडे, आनंद बाबुराव लादे, कृष्णत बापुराव पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.


































































