टुकार मालिका कशा बंद होतील… दामलेंनी दिलं भन्नाट उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते प्रशांत दामले हे त्यांच्या विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणासाठीदेखील चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते बऱयापैकी सक्रिय आहेत. या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. नुकतीच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. भावी रंगकर्मींच्या कार्यशाळेबाबत ही पोस्ट आहे. पोस्टवरील एका कमेंटने नेटकऱयांचे लक्ष वेधले आहे. ‘‘टुकार मालिका कशा बंद होतील?’’ असा प्रश्न एका चाहत्याने त्यांना कमेंट बॉक्समध्ये विचारला होता. त्यावर ‘‘बघणं बंद केलं की’’ असं भन्नाट उत्तर दामले यांनी दिले आहे. त्यांच्या या उत्तरामुळे नेटकऱयांमध्ये हशा पिकला आहे. या उत्तरावर अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. प्रशांत दामले सध्या विविध कार्यशाळांच्या माध्यमातून अभिनयाचे धडे देत आहेत. त्यांच्या या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 486 जणांनी इच्छा दाखवली होती. त्यातून 31 जणांना निवडून त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यावर ते तीन महिने काम करणार आहेत. राज्याच्या विविध भागातून हे भावी रंगकर्मी आल्याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.