
मध्य प्रदेशातील नूरजहां आंबा हा सर्वात मोठा आंबा म्हणून प्रसिद्ध आहे. आंब्याच्या शौकिनांसाठी यंदाच्या मोसमात जवळपास 4 किलो वजनाचा आंबा मिळण्याची शक्यता आहे. आंबा उत्पादकाने हा अंदाज वर्तवला आहे.
मूळ अफगाणिस्तानात आढळणाऱ्या या नूरजहां आंब्याची काही मोजकी झाडे मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागात आहेत. इंदूरपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या कट्ठीवाडातील आंबा उत्पादक शिवराजसिंह जाधव सांगतात की, यंदा त्यांच्या शेतातील नूरजहां आंब्याच्या तीन झाडांना 250 फळे लागली आहेत. येत्या 15 जूनपर्यंत ही फळे पिकून विक्रीसाठी तयार होतील. या आंब्याचे वजन 4 किलोग्रॅमपर्यंत भरेल.




























































