
सामना ऑनलाईन । गांधीनगर
गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात 14 महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्यानंतर उत्तर हिंदुस्थानींवर अनेक ठिकाणी हल्ले झाले. गुजरातच्या अनेक भागात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य करून मारहाण करण्यात आली. भेदरलेल्या उत्तर हिंदुस्थानी नागरिकांनी राज्यातून पळ काढण्यास सुरूवात केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री रुपाणी यांनी गेल्या 48 तासात परिस्थितीवर नियंत्रण आणल्याचे सांगितले.
भाजपची टीका
उत्तर हिंदुस्थानींवर हल्ला केल्याप्रकरणी आतापर्यंत 300 जणांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. तर याप्रकरणी राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज यांनी काँग्रेसला याप्रकरणी दोषी ठरवले असून काँग्रेसनेच लोकांना जातीवरून भडकावल्याचा आरोप केला आहे. तसेच स्वतःला जानवेधारी शिवभक्त म्हणवणारे राहूल गांधी गुजरातमध्ये सनातन धर्म सोडत असल्याची टीका करत त्यांनी केली आहे.
काँग्रेसचा भाजपवर आरोप
गुजरात काँग्रेस प्रदेशाध्याक्ष अमित चावडा यांनी भाजपला जबाबदार धरले असून ज्या राज्यात निवडणुका आहेत, तिथल्या लोकांवर भाजप हल्ला करत असल्याचे म्हटले आहे. तसेच या हल्ल्याचा निषेधही त्यांनी नोंदवला.
उत्तर हिंदुस्थानींना संरक्षण
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोलिसांना या बाबत योग्य कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री रुपाणी यांच्याशी संपर्क साधून संवाद साधला व दोषींवर करवाई व्हावी अशी मागणी केली. गृहमंत्री प्रदीप जडेजा यांनी काँग्रेसवर टीका करत जे निवडणुकीत हरले त्यांनी हे हल्ले केल्याचे म्हटले आहे. तसेच उत्तर हिंदुस्थानी नागरिकांना आम्ही सुरक्षा पुरवू. घाबरून त्यांनी आपल्या स्वगृही जाऊ नये असेही त्यांनी म्हटले.
It is our responsibility to provide security to those who come to Gujarat for employment from other states . We are in touch with the Central govt. We have submitted a report to the central govt regarding every incident: Gujarat Home Minister Pradeepsinh Jadeja pic.twitter.com/LLM7QvguYA
— ANI (@ANI) October 8, 2018
सहा जिल्हे प्रभावित
उत्तर हिंदुस्थांनीवर हल्ला केल्याने राज्यातील सहा जिल्हे प्रभावित झाले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामानिमित्त गुजरातमध्ये स्थलांतर झाले होते, या हल्ल्यानंतर त्यांनी पलायन करण्यास सुरूवात केली आहे. यात राज्यातील 6 जिल्हे प्रभावित झाले असून सर्वाधिक लोक मेहसाणा आणि साबरकांठा जिल्ह्यातून आपल्या स्वगृही परतत आहेत.


























































