‘मॉर्फ’प्रकरणी ममतांची माफी मागणार नाही

48

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मॉर्फ छायाचित्र फेसबुकवर शेअर करून मी कोणताही गंभीर गुन्हा केला नाही. त्यामुळे वेळ आली तर या प्रकरणी खटला लढेन  पण माफी मुळीच मागणार नाही असे पश्चिम बंगाल भाजप युवा मोर्चाच्या संयोजिका प्रियंका शर्मा यांनी सांगितले. सुटकेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.  पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही 18 तास तुरुंगात ठेवले. याला लोकशाही म्हणायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  दरम्यान न्यायालयाने प्रियंकाची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते, पण न्यायालय आदेशाची हार्ड कॉपी हवी अशी लंगडी सबब पुढे करून तुरुंग प्रशासन आणि पश्चिम बंगाल सरकारने प्रियंकांना आणखी एक रात्र तुरुंगात डांबले. या प्रकारावर सर्वोच्च न्यायालय अतिशय संतापले होते.

आपली प्रतिक्रिया द्या