नोटाबंदीचा त्रास सामान्यांना, ‘काळा पैसा’वाले फरार!

60

सामना ऑनलाईन । रायपूर

मोदी सरकारच्या नोटाबंदीदरम्यान सर्वसामान्यांनी लांबच लांब रांगांमध्ये थांबण्याचे कष्ट घेतले, मात्र कोणीही काळा पैसा असणाऱयांना या रांगेमध्ये पाहिले नाही. नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी हे आपले पैसे घेऊन देशातूनच फरार झाले, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या कांकेर येथील जनसभेत बोलताना भाजपवर केला.

छत्तीसगडमध्ये 12 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. 9 व 10 नोव्हेंबर या दोन दिवसांत राहुल गांधी पाच प्रचार सभा घेऊन रोड शोही करणार आहेत. प्रचार सभेच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी ते मुख्यमंत्री रमणसिंह यांचा मतदारसंघ असलेल्या राजनांदगाव येथे सभा घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला, शेतकरी आणि दलितांच्या विकासासाठी वापरायचा पैसा धनाढय़ उद्योगपतींकडे पोहचवला. राफेल विमानांच्या नावावर 30 हजार कोटी रुपये उद्योगपती अनिल अंबानी यांना गिफ्ट म्हणून दिले. आपल्या उद्योगपती मित्रांना करोडोंचा लाभ करून देण्यासाठी मोदी सरकारने भ्रष्टाचार केला आहे, असा आरोपही राहुल यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या