जोकोविचने मोडला फेडररचा विक्रम, 311 आठवडे नंबर वन स्थानावर विराजमान

सर्बीयाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याने सोमवारी ऐतिहासिक झेप घेतली. पुरुषांच्या एटीपी रँकिंगमध्ये त्याने 311 आठवडे नंबर वन स्थान कमावले.

यावेळी नोवाक जोकोविच याने रॉजर फेडररच्या 310 आठवडे नंबर वन स्थानावर कायम राहण्याच्या विक्रमाला मागे टाकले. मात्र सलग 237 आठवडे नंबर वन स्थानावर कायम राहण्याचा विक्रम अजूनही रॉजर फेडररच्या नावावर आहे हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या