
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. त्याशिवाय खातेधारकाला पीएफ बॅलन्स, पासबुक तपासता येणार नाही. ई-नॉमिनेशनसाठी नॉमिनीचे नाव आधी द्यावे लागेल. त्याचा पत्ता आणि खातेदाराशी असलेले नाते नमूद करावे लागेल. नॉमिनीच्या जन्मतारखेसोबत हेदेखील सांगावे लागेल की, पीएफ खात्यात किती टक्के रक्कम जमा केली जाईल. जर नॉमिनी अल्पवयीन असल्यास त्याच्या पालकाचे नाव आणि पत्ता देणे आवश्यक आहे. नॉमिनी व्यक्तीची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे, असे पीएफ संघटनेने स्पष्ट केले आहे.



























































