आता मुंबईत होणार क्षयरोगावर संशोधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

क्षयरोगाचा (टीबी) धोका ओळखून मुंबई महापालिकेने केंद्राकडे मुंबईत संशोधन केंद्र सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. मुंबई महापालिकेने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. केंद्राची परवानगी मिळताच मुंबईत टीबी संशोधन केंद्र सुरू होईल.

हिंदुस्थानात क्षयरोग रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यातच औषधांना दाद न देणाऱया रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होते आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने क्षयरोग विषाणूंचा शोध घेण्यासाठी आणि क्षयरोग रुग्णांचे निदान करून औषधोपचार सुरू करण्यासाठी मुंबईत टीबी संशोधन केंद्र सुरू करण्याचे ठरवले आहे. यासाठी पालिकेने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय.

यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आर. ए. कुंदन यांनी सांगितलं की, ‘टीबी रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण टीबीचा विषाणू औषधांना दाद देईनासा झालाय. त्यामुळे एमडीआर टीबी रुग्णांची संख्याही वाढतेय. याकरता टीबी विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी संशोधन केंद्र असावे, असा विचार पालिकेचा आहे.
औषधांना दाद न देणारा टीबीचा विषाणू पालिका आणि राज्य सरकारसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे या संशोधन केंद्राच्या माध्यमातून खूप मदत होईल असे टीबी तज्ञांचं मदत आहे.

-हिंदुस्थानात दरवर्षी ४ लाखांहून जास्त रुग्णांचा टीबीमुळे मृत्यू
-हिंदुस्थानात जगातील टीबी रुग्णांपैकी ६४ टक्के रुग्ण
– हिंदुस्थानात दरवर्षी २९ लाख टीबीचे नकीन रुग्ण
-औषधांना दाद न देणाऱया टीबीचे दरकर्षी १लाख ३०हजार रुग्ण
-२०१६ सालच्या नवीन केसेसमध्ये ६ टक्के लहान मुले

सद्यस्थितीला मुंबईच्या केईएम रुग्णालयात टीबीसाठी विशेष लॅब आहे. पण, टीबी विषाणूंचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास होणं गरजेचं आहे. शिवडी टीबी रुग्णालयात संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव महिनाभरापूर्वी पालिकेकडे पाठवलाय. टीबीचं नेमकं कारण शोधल्यानंतरच टीबीमुक्त मुंबई आपल्याला करता येईल. केंद्र सरकारने टीबीसाठी संशोधन केंद्रास मंजूरी दिली तर रुग्णांना याचा निश्चितच फायदा होईल.
– डॉ. ललितकुमार आणंदे, वैद्यकीय अधीक्षक,
शिवडी टीबी रुग्णालय

मुंबईत सध्या ६,५०० एमडीआर-टीबी रुग्ण असून एक्सडीआर-टीबी रुग्णांची संख्या ५,००० आहे. एमडीआर-टीबी रुग्णांसाठी सरकारने मोफत निदान आणि औषधांची सुविधा उपलब्ध केली आहे. पण, पौष्टीक आहार न मिळाल्याने रुग्णांच्या जीविताची जोखीम काढते. त्यामुळे एक्सडीआर आणि एमडीआर रुग्णांना मोफत पूरक पोषण आहार ‘रेडी टू इट’ या स्वरूपात दिला जातो.
– आर. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त,
मुंबई महानगरपालिका

महाराष्ट्र अर्बन मिशनचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार म्हणाले, ‘सरकारी वैद्यकीय विद्यापीठात टीबी संदर्भात संशोधन सुरू आहे. दरवर्षी संशोधनासाठी २० ते २५ कोटी रुपयांची तरतूद केली जाते. एमडीआर टीबी रुग्णांचा शोध घेण्यासाठी सरकारी रुग्णालयात संशोधन सुरू आहे.
– डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक, महाराष्ट्र अर्बन मिशन