
पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याने एनआरसीला घाबरून आत्महत्या केली आहे. निभाष सरकार असे मृत कार्यकर्त्याचे असून त्याने लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचारही केला होता.
लोकसभा निवडणुकीत निभाष सरकार यांचा हनुमानाच्या वेषातला एक फोटो व्हायरल झाला होता. पश्चिम बंगालमध्ये सरकार यांचा हा फोटो एक प्रचारातील एक ओळख झाली होता. पश्चिम बंगालचे भाजपचे उमेदवार जगन्नाथ सररकार यांचा प्रचार केला होता. निवडणुकीदरम्यान अमित शहा यांनी एनआरसीचा मुद्दा उपस्थित केला होता.
निभाष सरकार यांना आपल्या नागरिकत्वाचा कुठलाच पुरावा सापडला नाही. त्यामुळे निभाष सरकार अस्वस्थ असल्याची माहिती शेजारच्यांनी दिली. त्यामुळे निभाष सरकार यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येबद्दल कुटुबीयांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.



























































