
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सुपुत्र शौर्य डोवाल यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शौर्य यांच्या जीवाला धोका असल्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीरकरण देण्यात आले आहे.
अजित डोवाल यांचे सुपुत्र शौर्य डोवाल हे ‘इंडिया फाउंडेशन’ थिंकटँकचे प्रमुख असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफवर सोपवण्यात आली आहे.
अजित डोवल यांच्याप्रमाणेच शौर्य यांच्या जीवालाही धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला होता. गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर शौर्य यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.
झेड दर्जाची सुरक्षा प्राप्त झाल्याने आता शौर्य यांच्या सुरक्षेत एके-47 रायफलधारी कमांडो तैनात करण्यात येणार आहे. शौर्य यांच्यासोबत असे 15 ते 16 कमांडो त्यांच्यासोबत असतील. शौर्य यांचे वडील अजित डोवाल हे गेल्या चार वर्षांपासून डोवल झेड प्लस श्रेणीच्या कक्षेत आहेत.



























































