
एनसीईआरटीच्या 8 वी इयत्तेच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात आता शीख आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात विसर पडलेल्या राजांची कारकीर्द तसेच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा समावेश करण्यात आला आहे. मराठा साम्राज्यावर आता 22 पाने पुस्तकात असणार आहेत. पूर्वी दीड पानात मराठय़ांचा इतिहास सांगण्यात आला होता.
आठवीच्या एक्स्प्लोरिंग सोसायटी-इंडिया अँड बियॉण्ड या पुस्तकात शीख आणि मराठा इतिहासाशी संबंधित गोष्टी आधीच समाविष्ट होत्या. परंतु, आता तपशीलवार प्रकरणे पुस्तकात असणार आहेत. ही नवीन पुस्तके शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहेत. पुस्तकात ओदिशाचे गजपती शासक नरसिंहदेव प्रथम, राणी अब्बक्का, पहिला आणि दुसरा तसेच त्रावणकोरच्या मार्तंड वर्मा यांचा समावेश आहे. गुरू नानक यांच्या आध्यात्मिक प्रवासावर आणि गुरु गोविंद सिंग यांच्या लष्करी सामर्थ्यावरही पुस्तकात धडे असणार आहेत.