नुसरत जहाँने साडी नेसून शेअर केले फोटो, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

चित्रपट क्षेत्रातून राजकारणात आलेल्या टीएमसी खासदार नुसरत जहाँ या नेहमी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुसरत या सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून, येथून त्या नेहमी चर्चेत राहतात. कधी सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले जाते, तर कधी त्यांच्या फोटोसाठी त्यांना ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वीच करवा चौथच्या दिवशीचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. आता नुसरत जहाँ यांचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेक लोक त्यांचं कौतुक करत आहेत, तर काही लोक त्यांना ट्रॉल करत आहेत.

नुकतेच नुसरत यांनी इंस्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला असून, या फोटोमध्ये त्या साडीच्यावर फ्रंट ओपन डेनिम जॅकेट परिधान करताना दिसत आहेत. या फोटोत नुसरत यांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यांनी डोळ्यांवर सनग्लासेस देखील लावले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की,’ मी थकले आहे तरी पोझ देते’. नेहमीप्रमाणेच नुसरत यांचे हे फोटो देखील व्हायरल होत आहे.


View this post on Instagram

Tired yet posing.. #mixnmatch #denimwithsaree #daywear pic courtesy hubbilicious @nikhiljain09

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

या फोटोमध्ये नुसरत या एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहेत. अनेकांना त्यांची ही स्टाईल आणि फॅशन खूप आवडली आहे ,तर काही लोकांनी त्याची खिल्लीही उडवली. एका व्यक्तिने त्यांच्या फोटोवर टिप्पणी करत विचारले आहे की, ‘ही कोणती फॅशन आहे?’. मात्र बहुतेक कमेंट्समध्ये अनेकांनी नुसरत यांचे कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या