‘रोहिट’वादळात किवी सपाट; सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा ‘सुपर विजय’

Hamilton: India's Rohit Sharma celebrates with KL Rahul after hitting the winning runs in the super over to win the Twenty/20 cricket international between India and New Zealand in Hamilton, New Zealand, Wednesday, Jan. 29, 2020. AP/PTI Photo(AP1_29_2020_000149B)

रोमहर्षक, चित्तथरारक अशा तिसऱया टी-20 लढतीत पुन्हा ‘रोहिट’ वादळ हॅमिल्टन पार्कवर घोंघावले. मुंबईकर रोहित शर्माने सुपर ओव्हरपर्यंत लांबलेल्या ‘टाय’ लढतीत षटकारांची आतषबाजी करीत यजमान न्यूझीलंडच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला आणि विराटच्या टीम इंडियाला किवींविरुद्ध सुपर विजयासह ऐतिहासिक मालिका विजयही मिळवून दिला. किवींच्या घरात हिंदुस्थानचा हा पहिलावहिला टी-20 मालिका विजय आहे. या मालिकेत हिंदुस्थानी संघाने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

पाच लढतींच्या मालिकेतील तिसऱया टी-20 लढतीत मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलरला शमीने बाद केल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने हिंदुस्थानला दिलेले 18 धावांचे आव्हान रोहितने दोन खणखणीत षटकार ठोकत सहज पार केले. केन विल्यम्सनने या सामन्यात झटपट 95 धावांची खेळी केली तर रोहितच्या दमदार फलंदाजीमुळे विल्यम्सनची 95 धावांची झुंझार खेळी क्रिकेटशौकिनांना विसरावी लागली.

विराट सेनेने मागील पराभवांचे उट्टे फेडले

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने याआधी न्यूझीलंड दौऱयात दोन वेळा टी-20 मालिका खेळली आहे. यामध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडमध्ये फक्त एक सामना जिंकता आला होता. न्यूझीलंडमध्ये हिंदुस्थानला दोन्ही वेळेला मालिका जिंकण्यात अपयश आले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 2008-09 मध्ये 0-2 अशी हार पत्करली होती तर गेल्या वर्षी हिंदुस्थानी संघाला 1-2 असे पराभूत व्हावे लागले होते. या पराभवांचे उट्टे आज कर्णधार विराटच्या संघाने फेडले. न्यूझीलंडच्या भूमीत हिंदुस्थानने पहिल्यांदाच टी-20 मालिका जिंकली आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे.

संक्षिप्त धावसंख्या

  • हिंदुस्थान ः 20 षटकांत 5 बाद 179 n न्यूझीलंड ः 20 षटकांत 6 बाद 179

सुपर ओव्हरचा थरार, हिंदुस्थानला या निर्णायक षटकात विजयासाठी हव्या होत्या 18 धावा.

  • पहिल्या चेंडूवर हिंदुस्थानच्या दोन धावा. n दुसऱया चेंडूवर हिंदुस्थानची एक धाव.
  • तिसऱया चेंडूवर राहुलचा चौकार. n चौथ्या चेंडूवर हिंदुस्थानला पुन्हा एक धाव.
  • पाचव्या चेंडूवर रोहितचा षटकार, विजयासाठी 1 चेंडूत 4 धावा.
  • अखेरच्या चेंडूवर रोहितचा षटकार, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय.
आपली प्रतिक्रिया द्या