ओबीसी आरक्षणाची आज सोडत, 219 जागांसाठी लॉटरी; 17 जागांचे आरक्षण जैसे थे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत उद्या शुक्रवार, 29 जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 236 जागांपैकी 17 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण 31 मे रोजीच्या सोडतीत काढण्यात आल्याने ते ‘जैसे थे’च राहणार आहे. तर उर्वरित 219 जागांमधून ओबीसी आणि खुला प्रवर्ग स्त्री-पुरुषांसाठी आरक्षण जाहीर होणार आहे.