सैनिक शाळांमध्येही पुढील वर्षांपासून ओबीसींना आरक्षण, संरक्षण सचिवांची महत्त्वपूर्ण घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2021-22 या पुढील शैक्षणिक वर्षांपासून सैनिक शाळांमध्येही इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण लागू होणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजय कुमार यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल. यासंबंधी सर्व सैनिक शाळांच्या प्राचार्यांना आदेश जारी करण्यात आले आहेत, असे ट्विट कुमार यांनी केले.

सैनिक शाळांमध्ये 67 जागा या संबंधित राज्य वा केंद्रशासित प्रदेशासाठी राखीव असतात, तर उर्वरित 33 टक्के जागांवर परराज्यांतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. याआधारे तयार केल्या जाणाऱया दोन्ही याद्यांमध्ये आरक्षण लागू असेल.

देशात सध्या एकूण 33 सैनिक शाळा आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या सैनिक स्कूल्स सोसायटीमार्फत या शाळांचे कामकाज चालते.

आरक्षण कसे असेल?

  • अनुसूचित जातीसाठी 15 टक्के
  • अनुसूचित जमातीसाठी 7 टक्के
  • इतर मागास प्रवर्गासाठी 27 टक्के
  • संरक्षण प्रवर्गासाठी 13 टक्के
  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी 38 टक्के