Video – यवतमाळमध्ये दीडशे कोटी वर्षांपूर्वी होता समुद्र, वणी तालुक्यात आढळले जीवश्म

यवतमाळमध्ये तब्बल दीडशे कोटी वर्षापूर्वी समुद्र होता. त्याबाबत पुरावेही आढळले आहेत. यवतमाळच्या वणणी तालुक्यात जीवाश्म आढळले असून पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी ही हे दुर्मिळ  जीवाश्म शोधून काढली आहेत.

पृथ्वीची उत्पत्त्ती 4.6 अब्ज वर्षापूर्वी झाली तर सजीवांची उत्पत्ति 3 ते 4 अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत, त्यांना स्ट्रोमाटोंलाईट (Stromatolite)असे म्हणतात. यासूक्ष्मजीवांना  सायनो बेक्टेरीया ( Cyanobacteria) असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटेरोझोईक (Nioproterozoic) काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे आढळतात.तेव्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू विकसित झाले. ती पृथ्वी वरील प्रथम विकसित झालेली जीव होती . ही सर्व आदीजीव खनिजे खाऊन ती जगत होती. पुढे अशाच जीवांपासून बहुपेशीय जीव विकसित होत गेले.

मासोळ्या, सरपटणारे जीव , विशाल आकाराचे डायनोसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला. चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली आहेत. यासजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स (Chroococales) आणि ओर्कोटोंरीअल्स (Oschilatorials) असे म्हणतात.

ही जीवाश्मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समुहाने राहत होती. पुढील क्रिटाशिअस  काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला आणि चीखलांचे रुपांतर चुनडकात झाले आणि जीवांचे रुपांतर जीवाश्मात झाले. आजही कोट्यवधी वर्षानंतर चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा स्पष्ट दिसतात. ही जीवाश्मे यवतमाळ जिल्ह्यातील वणी जवळ मोहोरली – बोर्डा  परिसरात आढळली असल्याचे प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या