
एक किलो सोने, दोन किलो चांदी, 44 भूखंड, 1.34 कोटी रुपये बँक बॅलन्स, 2.38 कोटी रोकड, दोनमजली आलिशान भवन… ही सर्व त्या सरकारी कर्मचाऱ्याची संपत्ती, ज्याचे मासिक वेतन अंदाजे एक लाख रुपये आहे.
ओडिशा राज्यातील बौध जिल्ह्यातील मोटार वाहन निरीक्षक गोलाप चंद्र हासदा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या घरावर दक्षता पथकाने धाड टकाली. या धाडीत भरमसाट संपत्ती सापडली. शिवाय खात्यातही करोडो रुपये आहेत. मुलीला शिक्षणासाठी 40-50 लाखांची फी भरली आहे. दक्षता विभागाने हांसदा येथे सहा ठिकाणी छापे टाकले होते.
हासदा आणि त्याच्या कुटुंबाच्या ताब्यातील एकूण 44 भूखंड, एक किलो सोने, 2.126 किलो चांदी आणि 1.34 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बँक ठेवी उघड झाल्या. एका डायरीत त्याच्या अन्य बेकायदेशीर मालमत्तांची नोंद होती, ती डायरी आणि 2.38 लाख रुपये रोख सापडले आहेत.
हासदा हा 1991 मध्ये सरकारी नोकरीला लागला होता. त्याचा सध्याचा मासिक पगार हा मासिक पगार 1.08 लाख रुपये आहे. वार्षिक उत्पन्न सुमारे 13 लाख होते. एवढ्याशा पगारातून या अधिकाऱ्याने करोडोंची मालमत्ता कशी जमा केली? याचा तपास केला जात आहे.