
ओडिशा राज्यात कित्येक वर्षांपूर्वी आढळणाऱया सुसरी ( घडियाल) नष्ट झाल्या आहेत. त्यांची प्रजाती खूपच धोक्यात आली आहे. मात्र वन्यजीवप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे ओडिशातील महानदीच्या पात्रात 43 वर्षांनंतर या मगरींच्या प्रजातींचा नैसर्गिक अधिवास दिसला आहे. सतकोसिया रेंजमधील बालदामारा भागातील महानदी परिसरात सुसरींचा विणीचा हंगाम सुरू आहे. साधारण 28 अंडय़ांतून पिल्लं बाहेर आली आहेत. त्यामुळे ओडिशा हे आता गोडय़ा तसेच खाऱया पाण्यातील सुसर आणि मगर अशा तीनही प्रजाती असलेले राज्य बनले आहे.
ओडिशात गोडय़ा पाण्यातील ’घडियाल’ मृत पावल्या आहेत. त्यांची संख्या वाढावी , त्यांनी अंडी घालावीत, यासाठी सुमारे 40 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. महानदीत मागील तीन वर्षांत 13 सुसरी आढळल्या आहेत. त्यापैकी केवळ आठ जगल्या आहेत. वनविभागाने त्यापैकी दोघांना रेडियो कॉलर यंत्रणेतून ट्रक करायला सुरुवात केली आहे. महानदी परिसरातील गावांमध्ये 300 लोकांना जागरुक करण्यात आले आहे.



























































