
सामना प्रतिनिधी । पुणे
हॉटेल बुकिंगसाठी ‘पेटीएम’द्वारे ‘ट्रिव्हॅगो ट्रिप्स’ कंपनीला पैसे जमा करूनही हॉटेल बुकिंग न केल्याने कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फर्म व्यवस्थापक दीपक शर्मा आणि बुकिंग व्यवस्थापक आदित्य शुक्ला या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र जोग (वय ५०, रा. एरंडवणे) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. जोग यांना इंदूर येथे जायचे होते. त्यासाठी ट्रिव्हॅगो कंपनीचे शर्मा आणि शुक्ला या दोघांनी पॅकेजची माहिती दिली. चर्चेनंतर ५५ हजार ४९९ रुपये ‘पेटीएम’द्वारे जमा केले. परंतु ‘ट्रिव्हॅगो ट्रिप्स’ने हॉटेल बुकिंग न देता त्यांची फसवणूक केली. त्यामुळे जोग यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. घोडके तपास करीत आहेत.






























































