हातकणंगलेमध्ये लाचप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक

395
प्रातिनिधिक फोटो

हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथील आनंदा मारूती वाघमारे (वय 45) यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी आनंदा पांडूरंग द्रवीड ( रा . कागल ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हातकणंगले पंचायत समितीसमोर अटक केली. तक्रारदार आनंदा मारुती वाघमारे यांना जि. प.च्या रमाई योजनेतून घरकूल मंजूर झाले होते. त्याचे अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी आनंदा द्रवीड यांनी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 5 हजार रुपये देण्याचे ठरले. अनुदान मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार वाघमारे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार सापळा रचून ग्रामविकास अधिकारी द्रविड यांना अटक करण्यात आली. अधीकक राजेश बनसोडे , सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत, नवनाथ कदम, शरद पोरे, मयुर देसाई, रुपेश माने, संग्राम पाटील, सुरज अपराध, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या