एक झाड लावा, क्वार्टर मिळवा; ‘डोकेबाज’अधिकारी निलंबित

381

सामना ऑनलाईन । नगर

जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी नगर येथील महापालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकाऱ्याने अनोखी शक्कल लढवली. ‘पावसाळ्यात एक झाड लावा, वाढवा आणि हिवाळ्यात एक क्वार्टर मोफत मिळवा’ अशी योजना या अधिकाऱ्याने आखली होती, मात्र ही योजना राबविल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी या अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखविला आहे.

वृक्ष लागवड ही चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न होत आहेत. काही अधिकारीही वेगवेगळ्या कल्पना आखत आहेत. नगर महापालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकारी किशोर देशमुख यांनी झाड लावणाऱ्याला मोफत क्वार्टर देण्याची योजना तयार केली. विभागाच्या व्हॉटस्ऍप ग्रुपवर ही योजना त्यांनी जाहीर केली. ‘पावसाळ्यात लावलेले झाड वाढवा आणि हिवाळ्यात एक क्वार्टर मोफत मिळवा, या सुवर्णसंधीचा लाभ घ्या, असे देशमुख यांनी व्हॉटस्ऍप मेसेजमध्ये म्हटले होते. या योजनेची महापालिका कर्मचारी युनियनने थेट आयुक्तांकडेच तक्रार केली. याप्रकरणी देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली होती, मात्र आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी देशमुख यांना निलंबित केले.

आपली प्रतिक्रिया द्या