जुन्या वादातून तरूणावर घातला कुऱ्हाडीचा घाव, शेजाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

जुन्या भांडणाच्या रागातून शेजाऱ्याने तरूणावर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कुंजीरवाडीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केले आहे.

सुखराज उर्फ सुका भंडलकर (30, रा. कुंजीरवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बाळू दशरथ वळखिंडे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी गिता वळखिंडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडलकर आणि वळखिंडे शेजारी राहायला आहेत. त्यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग आल्यामुळे सुखराजने गुरुवारी बाळूला तुला आज जिवंत सोडणार नाही, आज तु जिवंत कसा राहतो तेच बघतो असे म्हणत कुऱ्हाडीने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी तपास करीत आहेत.