
जीमेल यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच जीमेल युजर्सना त्यांचे ईमेल आयडी बदलता येणार आहे. पूर्वी टोपण नावांनी सुरू केलेले जीमेल आयडी आता बदलता येणार आहे.
गुगलच्या हिंदी सपोर्ट पेजवरून ही माहिती मिळाली आहे. गुगलच्या हिंदी सपोर्ट पेजनुसार सर्व युजर्ससाठी Google अकाऊंटचे ईमेल अॅड्रेस बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. कदाचित हा पर्याय सध्या तुमच्यासाठी उपलब्ध नसेल मात्र लवकरच तो उपलब्ध होऊ शकतो. ज्या युजर्सनी खूप आधी जीमेल आयडी बनवले त्यांना याचा फायदा होणार आहे. ज्यांनी पूर्वी अकाऊंट बनवताना आयडीच्या नावावर लक्ष दिले नाही. त्यावेळी टोपण नाव किंवा बालपणीचे नाव जोडले असेल आणि आता तोच ईमेल आयडी व्यावसायिक कारणासाठी वापरला जात आहे. त्यांना जुना ईमेल आयडी बदलता येणार आहे. नवभारत टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
जीमेल पत्ता बदलल्यानंतर जुना ईमेल अॅड्रेस उपनाम होईल. उपनाम वापरणे म्हणजे तुमचा जुना ईमेल पत्ता काम करत राहील आणि त्या पत्त्यावर पाठवलेले सर्व ईमेल तुमच्या नवीन इनबॉक्समध्ये येतील. असे वृत्त आहे की, वापरकर्त्याला एकाच जीमेल खात्यासाठी चार वेगवेगळे ईमेल पत्ते ठेवण्याची परवानगी असेल, असे म्हटले आहे.































































