संगमेश्वरमध्ये वृध्दाची गळफास घेत आत्महत्या

454

संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथे मानसिक तणावातून वृध्दाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्माराम पांडुरंग कदम ( वय 65,रा.देवडे कदमवाडी संगमेश्वर,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या भावाने पोलिसांना महिती दिली. चार महिन्यांपूर्वी आत्माराम कदम यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्याचा कदम यांना मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ते आजारी असल्याने सतत मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या