जुनी पेन्शन आंदोलनाचा फटका ! शाळा, महाविद्यालयातील कामकाजावर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी उद्यापासून पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व पदवी महाविद्यालयांना बसणार आहे. बोर्डाच्या परीक्षा काळात तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा सुरू होण्याच्या दरम्यानच शिक्षक संपात सहभागी झाल्याने उद्या, 14 मार्चपासून अनुदानित शाळा, महाविद्यालयांतील शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारी, निमसरकारी कर्मचाऱयांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीत समितीला राज्य सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने उद्यापासून सुरू होणाऱया संपावर ठाम राहण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर या संपाचा फटका राज्यातील लाखो शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसणार आहे.

निकालही लटकणार? महाविद्यालयीन परीक्षा पुन्हा ठप्प

संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांनी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. हे बहिष्कार आंदोलन असेच सुरू राहिले तर दहावी, बारावी निकाल लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यांनी सांगितले. राज्यातील अनुदानित पदवी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील अंतिम परीक्षा ठप्प होणार आहे.