अश्वारोहणमध्ये अनुष अग्रवालाला ऑलिम्पिक कोटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकविजेत्या अनुष अग्रवाला याने ड्रेसाज प्रकारात हिंदुस्थानला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला. हिंदुस्थानी अश्वारोहण महासंघाने ही माहिती दिली. अनुषने गतवर्षी चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

अनुषने अश्वारोहणाच्या ड्रेसाज प्रकारातील एकेरीमध्ये हिंदुस्थानला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इक्वेस्ट्रियम स्पोर्ट्सकडून ही घोषणा करण्यात आली. अनुषने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानला हा ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला, अशी माहितीही त्यांनी दिली. त्याने पोलंड, नेदरलॅण्ड्स, जर्मनी व बेल्जियम येथे झालेल्या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे हिंदुस्थानला हा ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला. तो ऑलिम्पिक कोटा मिळविणारा आठवा हिंदुस्थानी अश्वारोहक ठरला आहे. त्याच्या आधी फवाद मिर्झाने 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये अश्वारोहण खेळात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते.