ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट; शिव, आशीष, पूजाची फायनलमध्ये धडक

olympic

हिंदुस्थानच्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंटमधील शानदार कामगिरी बुधवारीही सुरूच राहिली. शिव थापाने 63 किलो वजनी गटात, पूजा रानीने 75 किलो वजनी गटात आणि आशीषने 69 किलो वजनी गटात फायनलमध्ये धडक मारून सुवर्ण पदक मिळवण्याची आशा कायम ठेवली. हिंदुस्थानच्या चार बॉक्सर्सना मात्र कास्य पदकावरच समाधान मानावे लागले.

शिव थापाने जपानच्या देईसुक नरीमातसू याला पराभूत करीत फायनलचे तिकीट बुक केले. पूजा रानीने ब्राझीलच्या ब्रिटीज सोरेसला पंचेस मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. आशीषने जपानच्या हिरोकी किनजोला हरवत सुवर्ण पदक जिंकण्याच्या दिशेने झेप घेतली.

ज्युनियर वर्ल्ड चॅम्प निखतचा तिसरा क्रमांक

हिंदुस्थानच्या चार बॉक्सर्सने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीनने 51 किलो वजनी गटात कास्य पदकावर मोहोर उमटवली. सिमरनजीत कौरने 60 किलो वजनी गटात, सुमीत सांगवानने 91 किलो वजनी गटात आणि वाहलिमपुईयाने 75 किलो वजनी गटात कास्य पदक जिंकले.

आपली प्रतिक्रिया द्या